राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य परिसरात आज रविवार, दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गव्यांचा मोठा कळप मुक्तपणे फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.या गव्यांच्या अचानक व मुक्त हालचालीमुळे परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सकाळच्या सुमारास दाजीपूरच्या पश्चिमेला असलेल्या वनकाठाच्या भागात तब्बल 15 ते 20 गवे एकत्रितपणे फिरताना दिसले. काही गवे रस्त्यावर आले होते, तर काही शेतीच्या कडेला फिरत होते.