राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी 'बेमुदत कामबंद' आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दि. १४ मार्च २०२४ रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, वेतनवाढ, ईपीएफ, आरोग्य व अपघात विमा आदी लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला खा. धानोरकर यांनी आज दि २५ आगस्ट ला १२ वाजता भेट देऊन पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला आहे.