मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्ध मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्टपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आर्थिक विवंचनेमुळे जाता येत नसल्यामुळे एक तरुण विषारी औषध पिला होता. उपचारा दरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या निधनाने आहेरवडगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत. भरत यादव खरसाडे (वय 22 वर्षे) असे मयताचे नाव आहे.