मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता राधानगरीतून सर्व समाजाच्या वतीने ठाम पाठिंबा देण्यात आला. येथील नागरिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनास समर्थन व्यक्त केले.या प्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आंदोलनाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली.