ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ₹३३ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी इसम (वय ६७, रा. हडपसर) यांना अज्ञात मोबाईल धारकाने १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान संपर्क साधला. शेअर बाजारात जास्त परतावा मिळेल, या बहाण्याने फिर्यादींना एक एपीके फाईल मोबाईलवर डाऊनलोड करण्