Download Now Banner

This browser does not support the video element.

मंगळवेढा: कचरेवाडी पुलाजवळ मागील भांडणाच्या रागातून एकास पीव्हीसी पाईपने मारहाण, मंगळवेढा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Mangalvedhe, Solapur | Sep 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी पुलाजवळ एका २० वर्षीय तरुणावर PVC पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी ऋतीक सुरेश काळुंखे (रा. शेलेवाडी) व अन्य तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अमर बाबासाहेब सावंत (वय २०, रा. शेलेवाडी) याने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो कचरेवाडी पुलाजवळ असताना, मागील वादाचा राग मनात धरून ऋतीक काळुंखे व त्याच्या सोबत असलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us