धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला मालेगाव शहरातून मिळालेल्या पराभवानंतर आता भाजपा येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाली नवतरुणांची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली तसेच भाजप मालेगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणीची घोषणा आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी केली. युवा नेते कमलेश निकम यांची पुन्हा जिल्हा महामंत्रीपदी निवड झाली.