काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देत भाजपा महिला आघाडीने शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) दुपारी पाच वाजताच्या सुमारास लोकनायक जयप्रकाश नारायण चौकात जूते मारो आंदोलन केले. राहुल गांधींच्या प्रतिमेला जूते मारून काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार