पातुर तालुक्यातील बाबुळगाव ते आलेगाव रस्ता गेल्या दोन दशकांपासून खड्डेमय व धोकादायक अवस्थेत आहे. अलीकडेच अपघातात आलेगावच्या महिलेला दुखापत झाली. वारंवार निवेदने दिल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..