वाघोली येथील बकोरी रस्त्यावरील मोठ्या सोसायटी मधील रहिवाशी व स्थानिक नागरिक हे रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. बकोरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठ्या सोसायटी आहेत. येथे जाण्यासाठी अवघा दहा फुटाचा रस्ता आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व रस्त्यात खड्डे आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिक यावेळी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.