भडगाव नगरपरिषद माजी नगराध्यक्ष व पंचायत समिती माजी सभापती श्री. राजेंद्र महादु पाटील यांनी स्वतःच्या शेतातील पिकाची हानी पत्करून सर्वसामान्य आर्थिक झळ सहन करून जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. आपली खासगी विहीर नगरपरिषदेच्या ताब्यात देऊन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरीच्या पाण्याद्वारे नगरपरिषदेमार्फत भडगावकरांना दर दोन दिवस आड नियमित पाणीपुरवठा केला जात आहे.