लातूर : निम्न तेरणा प्रकल्प माकणी येथील धरण क्षेत्रात वाढत्या पाणलोट आवक लक्षात घेऊन प्रशासनाने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (दि. 09 सप्टेंबर 2025) सकाळी ठीक 08.00 वाजता धरणाची दोन वक्रद्वारे 10 सेंटीमीटर ने उघडली. या माध्यमातून तेरणा नदीपात्रात एकूण 765 क्यूसेक्स (21.664 क्यूमेक्स) इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.