डॉल्बी,बेंजो आणि फटाक्यांच्या गोंगाटापासून दूर राहत, कुंभोज येथील विक्रमसिंह तरुण मंडळाने यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत एक आगळीवेगळी आणि भक्तिभावाने परिपूर्ण परंपरा जपली.वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक दिंडीच्या माध्यमातून मंडळाने आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आपल्या बाप्पाला निरोप दिला."गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंगगायन आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात निघालेली ही भक्तिरसात न्हालेली मिरवणूक कुंभोज नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण करून गेली.