भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दि. १४ मे रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजता दरम्यान टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू व जुगाराचे ४ अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. यात ६ आरोपींच्या ताब्यातून ४३ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर आरोपींवर जवाहरनगर, सिहोरा व गोबरवाही या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.