वणी पोलीस स्टेशन हद्दीत विद्यानगरी परिसरात रात्रीच्या गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली करत असलेला एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. सदर तरुण आपले अस्तित्व लपवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने हालचाल केल्याचा संशय असल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.