अंजनगाव सुर्जी येथील सुर्जी परिसरातील नेहरू चौकात आज दुपारी १:३० वाजताच्या सुमारास चारचाकी व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.मिळालेल्या माहितीनुसार हिंदू स्मशान भूमीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच ०५ सी एम ७५७२ इर्टिका चारचाकी वाहन चालकाने दुचाकी क्रमांक एम एच २७ डी ओ ०२२७ ला जोरदार धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वार आकाश तेलगोटे (वय ३५ रा.भंडारज) हा गंभीर जखमी झाला.घटनेच्या पश्चात घटनास्थळी पोलीस दाखल झाले.