हैदराबाद व इतर गॅझेटमध्ये मराठा-कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे राज्य सरकारने मान्य केल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. या पार्श्वभूमीवर सकल ओबीसी युवक राजूराच्या वतीने आज दि.3 सप्टेंबर 12 वाजता निवेदन सादर करण्यात आले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठविण्यात आले असून उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. दीपक चटप, नरेंद्र काकडे, सचिन कुडे, मधू चिंचोलकर आदींसह उपस्थित होते.