गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी 1 लाख 50 हजार यांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी जितेंद्र सोमनाथ कामत हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला.बेडरूम मधील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरी करून नेला.