खुनातील आरोपी अवघ्या 12 तासांत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बीड शहरात 02 सप्टेंबर 2025 रोजी रात्री उशिरा घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अभिषेक राम गायकवाड या तरुणाने आपल्या मित्राला, विजय सुनिल काळे याला धारदार चाकूने वार करून ठार मारले. गंभीर जखमी अवस्थेतच काळे याचा जागीच मृत्यू झाला, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. शिवाजीनगर पोलिसांनी अखेर आरोपीला काकड हिरा शिवारातील डोंगरात पकडले.