सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे हद्दीत कामसिद्ध मंदिराच्या खुल्या जागेत पोलिसांनी कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा टेम्पो पकडला. जनावरांना दाटीवाटीने भरून वाहनात योग्य हवा न येऊ देता झाडाला बांधलेल्या अवस्थेत पोलिसांनी जनावरे ताब्यात घेतली. याप्रकरणी १४ जुलै रोजी ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आरिफ शेख, साहिल शेख, एकनाथ रामपुरे,साहिल वाघमारे,नजीर सौदागर अशी आरोपींची नावे समजत आहेत. याबाबत सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निशांत सावजी यांनी फिर्याद दिली आहे.