गेवराई तालुक्यातील टाकळगाव बंधाऱ्याजवळ एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर गेवराई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. सदर इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याने अंगावर निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. प्राथमिक तपासानुसार हा इसम पुराच्या पाण्यात वाहून आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आला आहे.