अकोला ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या कर भरण्यासाठी ऑनलाईन क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले.