दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणात अळ्या व सोंडे निघाल्याचे आज दुपारी १ वाजता उघड झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड आला असून रुग्णाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनामार्फत रुग्णांना मोफत जेवण दिले जाते.अनेक रुग्णांच्या भाजीमध्ये चक्क अळ्या व सोडे निघाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.तसेच भरती रुग्णांना निकृष्ट जेवण देता का? असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.