लिंबगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सुगाव बु.व राहाटी येथे वारंवार कारवाई करून देखील अवैधरित्या दारू विक्री करण्याचा धंदा सुरूच असल्याने गावातील लोक व्यसनाधीन होत असल्याची तक्रार होत होती, त्या अनुषंगाने दोन्ही गावातील ग्रामपंचायतचा ठराव मंजूर करून लिंबगाव पोलिसांनी हे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या टपऱ्या जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आली असल्याची माहिती आजरोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास देण्यात आली आहे.