सेनगांव तालुक्यातील गोरेगांव येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची राख घेऊन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत आज कर्जमाफी सह विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा निघणार असून त्या अनुषंगाने हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची राख घेऊन शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत.