लातूर-'-यंदा आवाज कानावर नव्हे मनावर' या थीम वर आधारीत लातूरातील दिव्यांग विध्यार्थांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाद्वारे आपली कला सादर करीत शब्दाविना सूर घुमविला. बाप्पा गणेश मंडळ व जीवन विकास प्रतिष्ठान संचलित ॲड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयातील २५ विद्यार्थ्यांच्या दिव्यांग चमूने शनिवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाच्या गजरात आवाज दणाणून सोडला होता.