देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचे बलिदान देणार्या हुतात्म्यांच्या स्मृती पुढील पिढीला आदर्श ठराव्यात या उद्देशाने खटाव तालुक्यात हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. पुसेसावळी भागातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात शेकडो स्वातंत्र्यसैनिनी आपला सहभाग नोंदविला, त्यातील अनेक शहीद झाले होते, त्यांच्या स्मृती कायम ठेवून पुढील पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा,असे आवाहन आ. मनोजदादा घोरपडे यांनी केले. वडगाव जयराम स्वामींचे येथे हुतात्म्यांना मंगळवारी सकाळी दहा वाजता अभिवादन करण्यात आले.