आंदोलन कसे हाताळायचे या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे कौशल्य आहे त्यांनी ते दाखवलं पाहिजे. आमची लढाई शेतकऱ्यांची आहे शेतकरी सर्वच जातीपातीत आहेत. त्याचा या आंदोलनावर कोणते परिणाम होऊ नये असा आम्ही प्रयत्न करतो. आंदोलन कुठलंही असो पण आंदोलकांना दुश्मन समजू नये आंदोलक आपल्या मागणीसाठी येत असतात.पण तुम्ही तिथे हॉटेल बंद करून टाकली चहापाण्याची व्यवस्था बंद करून टाकली ही तर मोबाईल शाही झाली.हे व्यवस्थितपणे हाताळले गेले पाहिजे ते कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी ते दाखवलं पाहिजे.