आज १ सप्टेंबर सोमवार रोजी २ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती महानगरपालिका व विधिमंत्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती फोटोग्राफी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरातील तसेच परिसरातील सर्व छायाचित्रकारांना आपला कलागुण सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.या स्पर्धेचा उद्देश अमरावतीचे सांस्कृतिक, नैसर्गिक व शहरी सौंदर्य छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रदर्शित करणे हा आहे. स्पर्धेसाठी खालील तीन विषयांवर आधारित छायाचित्रे स्वीकारली जाणार आहेत...