जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, प्रत्येकी महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, तथापि माहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच 1 सप्टेंबर, 2025 रोजी ज्येष्ठ गौरीपूजनाची सुट्टी असल्यामुळे सप्टेंबर, 2025 मधील जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार, 2 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 1 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.