सेनगांव शहरात आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून या बैठकीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच सेनगांव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक संपन्न झाली.तसेच बैठक झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने तहसीलदार सेनगांव यांना मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.