सोलापूर शहरांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे रेशन च्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.ही घटना मोदी भागामध्ये दि.११ सप्टेंबर रोजी दूपारी उघडकीस आली, सर्प मित्र सिद्धेश्वर मिसालेलू आणि शिवसेनेचे जिल्हा युवाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.