दारव्हा शहरातील गोळीबार चौकातील शिवकृपा ज्वेलरी दुकानातून तब्बल ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या अज्ञात बुरखा परिधान केलेल्या महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये दिलासा व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.