कोल्हापुरात तब्बल २० तासाहून अधिक काळ गणपती विसर्जनाच्या मिरवणुका पार पडल्या. मिरवणुका पाहण्यासाठी महाद्वार रोड परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. क्रांतिवीर भगतसिंग फ्रेंड सर्कल विक्रमनगर या मंडळाची गणेश मूर्तीची पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी आरती करून शेवटचा गणपती बाप्पाची तिकटी येथून पुढे इराणी खणीकडे मार्गस्थ झाला. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून दुपारी1.30 वाजता देण्यात आली.