राज्य सरकारने मंजूर केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ घटनाविरोधी असून लोकशाहीस बाधक आहे. तसेच कामगारांच्या ८ तासांच्या कामाच्या वेळेऐवजी १२ तास कामाचा निर्णय हा तुगलकी असल्याने तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी भाकप-आयटकतर्फे १० सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता राजेश्वर मंदिर मागील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. या कायद्याचा वापर सरकारवर टीका करणाऱ्या सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी व कामगारांना गप्प करण्य