कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोनके येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जागेच्या मालकी हक्कावरून सोमवारी रात्री दोन गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद न्यायप्रविष्ट असतानाही दोन समाजांमधील तणाव चिघळताच वाठार स्टेशन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत कोरेगावचे तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता माहिती मिळाली.