मागील काय दिवसापूर्वी गडकरी रंगायतन च्या नूतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले,मात्र दाखवण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये ठाणे शहराचा विकास आणि ठाण्याचे आतापर्यंत रंगमंचावर गाजवलेले कार्यक्रम दाखवणे ऐवजी काहीतरी वेगळेच दाखवले. त्यामुळे ठाणे महानगरपालिका एकाच्या रिमोट कंट्रोल वर चालते,ते सांगतील तेवढेच दाखवलं जातं असं म्हणत आमदार संजय केळकर यांनी उद्घाटनाच्या चित्रफिती वरून नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया आज 23 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दिली