कोकणातील मुरूड जंजिरा येथील कामोद रवींद्र नामजोशी यांनी न्यूझीलंड मधील ऑकलंड मध्ये मराठमोळ्या कुटुंबात लेझीमच्या तालावर आज सकाळी अकरा वाजता गणपती बाप्पा विराजमान झाले. कामोद नामजोशी हे मुरूडमधील प्रसिद्ध दंत चिकित्सक आणि संगीत प्रेमी डॉ रवींद्र नामजोशी यांचे चिरंजीव आहेत. ते व्यवसायानिमित्त न्यूझीलंड मधील ऑकलंड मध्ये स्थिरावले आहेत. त्यांनी गणेश चतुर्थी निमित्त आपल्या तेथील निवासस्थानी गणरायाची स्थापना केली.