जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा खुर्द येथे २५ वर्षीय तरुणाचा विजेचा शक लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी 9वाजून 30 मिनिटाच्या सुमारास घडली. सदर तरुण बकऱ्या करण्यासाठी जात असताना जवळच असलेल्या डीपीजवळ त्याला शॉक लागला यामध्ये त्याचा मृत्यू झाला. जळगाव जामोद पोलिसांनी याविषयी मर्ग दाखल केला आहे.