यावल शहरातील बाबूजी पुरा भागात एका पाच वर्षीय बालकाची मुस्लिम खलिफा न्हावी समाजाचा तरुण शेख शाहिद याने निर्घृण हत्या केली होती. तेव्हा या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी यावल शहरातून समस्त मुस्लिम खलिफा न्हावी समाज बांधवांनी माजी उपनगराध्यक्ष रफीयोदिन अब्दुल हमीद शेख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात व पोलीस ठाण्यात निवेदन दिले व या गुन्ह्यातील दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी केली.