नांदुरा खामगाव रोडवर चिखली फाट्या नजीक अज्ञात वाहण्याच्या धडकेमध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना काल २ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.सदर घटनेची माहिती नांदुरा येथील येथील तहसीलचे कर्मचारी पटेल व प्रदीप इंगळे यांनी ओम साई फाउंडेशन ला दिली असता तत्काळ घटनास्थळी मदत कार्यासाठी दोन्ही रुग्णवाहिका सह स्वयंसेवक विलास निबोळकर अश्विन फेरण,कृष्णा वसोकार, अजय बराटे यांच्या मदतीने दोघांना खामगाव येथे हलवण्यात करण्यात आले.