अंजनगाव सुर्जी बस स्थानक चौकात गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.केळीने भरलेला आयशर ट्रक अचानक पलटी झाल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली.या अपघातात एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार,आयशर ट्रक हा भरधाव वेगात हिवरखेड येथून केळीचे कॅरेट भरून अकोट अंजनगाव मार्गे मध्यप्रदेश कडे जात असताना चालकाचे नियंत्रण बिघडले.