दसरा विजयादशमी सणानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले होते, यावेळी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस दलाकडील विविध शस्त्रांबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत होती, आज गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच विजयादशमी सणानिमित्त सीमोल्लंघनासाठी पेढा हनुमान मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.