परळी तालुका व परिसरातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आणि सर्वसामान्यांची कामे होत नसल्याने आपण भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राजेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संधी दिल्यास परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचेही ते म्हणाले.