आमदार मुनगंटीवार देखील विविध मंडळांना भेटी देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत आहेत. पण या आनंदात आणि उत्सवाच्या वातावरणातही त्यांनी रुग्णांच्या गैरसोयीची तातडीने दखल घेतली. जिल्ह्यातील मुल उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीच्या तक्रारी प्राप्त होताच आज दि. 5 सप्टेंबर ला 12 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळी कामे सोडून पहिले प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले.