Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहाडी: कारली येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर आंधळगाव पोलिसांची धाड, ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mohadi, Bhandara | Sep 9, 2025
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा कारली येथे दि. 8 सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी 12 वाजताच्या सुमारास आंधळगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राधेश्याम टेकचंद नागपुरे यांच्या हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील 30 लिटर हातभट्टीची दारू व एक मोटरसायकल क्र. एम एच 40 आर 9939 असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us