दहीगाव रेचा शेत शिवारात संत्रा तोडीसाठी गेलेल्या मो. रिजवान किस्मत खान हा १७ वर्षीय युवक कडू नाल्याच्या पाण्यात हात पाय धुण्यासाठी गेला असता त्याचा अचानक पाय घसरला आणि त्याचा नाल्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांला आज सकाळी ११:०० वाजता अमरावती जिल्ह्याचे खा.बळवंत वानखेडे यांनी भेट देवून मृतक मो रिजवान याच्या कुटुंबाचे सांत्वन केले.यावेळी स्व.रिजवान किस्मत खा याच्या कुटुंबीयाला शक्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचे आदेश खासदार यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले