महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या दोन प्रकरणांवर आज शुक्रवार, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये नांदणी मठाच्या माधुरी हत्ती प्रकरणासह एफ.आर.पी. एकरकमी देयकासंबंधीची याचिका या दोन मुद्द्यांचा समावेश आहे.या सुनावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी हे स्वतः आज सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिले.