कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान परवानगीशिवाय डॉल्बी साऊंड सिस्टिमचा वापर करून ध्वनीप्रदूषण करण्यात आले.तसेच “प्रेशर मिड” (कागद फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा) बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सहा गणेश मंडळांचे अध्यक्ष,डॉल्बी मालक तसेच “प्रेशर मिड” धारकांविरोधात आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता गुन्हे दाखल केले आहेत.