संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द येथे कुत्र्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या बाथरूममध्ये अडकल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, यशस्वीपणे बिबट्याची सुटका केली आणि त्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले. कुंभारखणीखुर्द येथील गावंडवाडीमध्ये राहणारे ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराजवळील बाथरूममध्ये पहाटे सुमारे ४.३० वाजता हा प्रकार घडला. बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना बाथरूममध्ये शिरला आणि दोन्ही प्राणी आत अडकले.